प्रतिपश्चंद्र (Pratipschandra )
- Featured
E 404 Rustic paradise
प्रतिपश्चंद्र– मराठीतील पहिली शिवकालीन ऐतिहासिक रहस्य कादंबरी.
पुस्तकाचे नाव- प्रतिपश्चंद्र
लेखक- डॉ. प्रकाश कोयाडे (MBBS)
प्रकाशन- न्यु इरा पब्लिकेशन, पुणे
प्रकार- मराठी ऐतिहासिक रहस्य कादंबरी
पाने – ४३८
‘प्रतिपश्चंद्र’
मराठीतील पहिली शिवकालीन ऐतिहासिक रहस्य कादंबरी… एक अद्भुत साहित्यकृती!
छत्रपती शिवाजी महाराज आणि गुप्तहेरप्रमुख बहिर्जी नाईक यांनी अत्यंत गुप्त पद्धतीने लपविलेले रहस्य…एक असे रहस्य ज्याची सुरक्षा आजही महाराजांचे आठ शिलेदार जीवाची बाजी लावून करत आहेत.
गेल्या साडेतीनशे वर्षांपासून अत्यंत गुप्त आणि गुढ पद्धतीने एक युद्ध या मातीत सुरू आहे. या युद्धात आजवर शेकडो लोकांनी एकमेकांचे जीव घेतले… जीव दिले आहेत.
चौदावे शकत, सतरावे शतक आणि एकविसावे शतक या तीन कालखंडाना जोडणारी ऐतिहासिक थरार कादंबरी ‘प्रतिपश्चंद्र’!
भरभराटीच्या उंचीवर असतानाच लयास गेलेले ‘विजयनगर साम्राज्य’ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना जोडणारा दुवा कोणता?
राज्याभिषेकानंतर झालेल्या दक्षिण दिग्विजयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना हाती कोणती गोष्ट लागली होती?
तामीळनाडूमधील चिदंबरम मंदिरातील नटराजाची मुर्ती सातशे वर्षांपासून कोणते रहस्य उजागर होण्याची वाट पाहत आहे?
स्वराज्याच्या सिंहासनाचे पुढे काय झाले…आज ते कुठे आहे?
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर असलेल्या ‘ग्रांडफादर्स क्लॉक’ किंवा ‘8 डे क्लॉक’ या घड्याळीचा याच्याशी काय संबंध?
छत्रपती शिवाजी महाराज आणि ‘आठ’ या अंकाचा संबंध!
राजभवनात एका ब्रिटीश अधिकाऱ्याने सव्वाशे वर्षांपूर्वी कोणती मौल्यवान वस्तू भिंतीत लपवून ठेवली आहे?
बहिर्जींनी आठ शिलेदारांच्या हाती सोपविलेली ‘ती चावी’ कुठे आहे?
मंत्रालयाला लागलेल्या आगीत नेमकी कोणती महत्त्वाची कागदपत्रे जळाली?
छत्रपती शिवाजी महाराजांकडील जगदंबा तलवारीवर तीन वेळेस कोरलेले ‘IHS’ हे इंग्रजी शब्द कोणते रहस्य बाळगून आहेत?
अशा शेकडो गूढ प्रश्र्नांची उत्तरे म्हणजे प्रतिपश्चंद्र!
गुप्तहेरप्रमुख बहिर्जी नाईकांचे आजवर कधीही बाहेर न आलेले रूप, कल्पनाशक्ती आणि अचूक नियोजाचा संगम म्हणजे प्रतिपश्चंद्र!
एक सायक्याट्रिस्ट डॉक्टर एका न्यायाधीशांच्या खुनाच्या आरोपाखाली अटक होतो आणि सुरू होतो एक अद्भुत, अनाकलनीय एक ऐतिहासिक प्रवास… कलेकलेने वाढत जाणाऱ्या प्रतिपदेच्या चंद्राचा प्रवास!
विजयनगर साम्राज्याकडून स्वराज्याच्या खांद्यावर आलेली एक जबाबदारी…
महाराष्ट्रातील आजवरचे सर्वात मोठे रहस्य… प्रतिपश्चंद्र!
इतिसातील काही सत्य घटना आणि त्यात गुंफलेली लेखकाची अफाट कल्पनाशक्ती, तितकेच प्रबळ प्रत्येक पात्र, ओघवती भाषा, वेगवान घटनाक्रम, डोके बधीर करून टाकणारे सस्पेन्स, अद्भुत निसर्गवर्णन आणि अचूक आयुष्याचे तत्वज्ञान… एक अद्भुत मिश्रण!
दर्जेदार मराठी लिखाण!
प्रत्येक मराठी माणसाने वाचलंच पाहिजे… प्रतिपश्चंद्र!
————–
मुल्य:-
MRP – 390/-
Delivery Charges – 50/-
Total = 390 + 50 = 440/- Only (Including Delivery)
आजच ऑर्डर करा..!
ऑर्डर करण्यासाठी आपला पूर्ण पत्ता व मोबाईल नंबर कमेंट करा..!
किंवा
+91 8805432880
या क्रमांकावर व्हाट्सअप करा …!
————-
धन्यवाद..!
जय शिवराय..